नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सेवा निवृत्त पोलिस कर्मचा-याचा मृत्यू झाला. डिजीपीनगर येथील माऊली लॅान्स जवळ हा अपघात झाला. साहेबराव सोनू सांगळे (५९) रा. डिजीपी नगर २ असे मृत सेवा निवृत्त कर्मचा-याचे नाव आहे. या अपघात प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सांगळे हे दुचाकीवरुन घरी जात असतांना त्याच्या गाडीला कारने धडक दिली. त्यात त्यांच्या छातीला व पायाला जबर मार लागला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॅाक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सांगळे हे मुंबई येथे वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले. त्यात ही दुर्दैवी घटना घडली.