नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -ग्राहकांना आपल्या आवडीच्या भागात घर घेणे सुलभ व्हावे या साठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित दोन दिवसीय रिजनल प्रॉपर्टी महोत्सवास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आगामी गुढ़ी पाडवा आणि अक्षय तृतीया या सणासुदीचा कालावधी लक्षात घेता सुमारे ८० ते १०० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याची माहिती नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. या प्रदर्शनाची आज सांगता झाली.
ते पुढे म्हणाले की एकच शहरात ५ विविध ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदाच क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे करण्यात आला. या मुळे ग्राहक तसेच विकसक या दोघांना लाभ झाला. या प्रदर्शनाला आलेल्या अनेकांनी प्रदर्शन कालावधी मध्ये साईट विझिट देखील केल्या. प्रदर्शनास भेट दिलेल्या पैकी अनेक ग्राहक येत्या काही दिवसात आपली नोंदणी देखील करतील.
बांधकाम उद्योग हा शहराच्या अर्थ कारणं आणि रोजगाराशी निगडित असतो .त्या मुळे प्रदर्शनास मिळालेला प्रतिसाद बघता नाशिक च्या अर्थकारणाचे सकारात्मक संकेत मिळत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
नाशिक शहर सर्व दूर विस्तारित होत असून शहराच्या विविध भागात अनेक गृह प्रकल्प सुरू आहेत. आपल्या आवडत्या व सोयीच्या भागात ते देखील आगामी सणासुदीच्या मुहूर्तावर अनेकांचे आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांच्या आणि व्यक्त केला. क्रेडाई नाशिक मेट्रो चे काही सभासद पहिल्यांदाच अशा प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते .त्यांच्या साठी या निमित्ताने ब्रॅण्डिंग ची संधी उपलब्ध झाली असल्याचे देखील ते म्हणाले .
गृह खरेदीचा नवीन ट्रेंड
तीन ते पाच बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंट, स्टुडन्ट व सीनियर सिटीझन हाऊसिंग याकडे तसेच परवडणाऱ्या घरांनाही मागणी दिसत आहे.तसेच प्लॉट आणि फार्म हाऊस साठी देखील ग्राहक उत्सुक आहेत.या सोबतच नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या तालुका व जिल्ह्यांमधून नाशिकला स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नाशिक मध्ये घर घेण्याकडे वाढता कल .
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व माजी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सहसमन्वयक सचिन बागड , विजय चव्हाणके, अनंत ठाकरे, सतीश मोरे व शिवम पटेल तसेच मानद सचिव गौरव ठक्कर ,उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, दीपक बागड, जयंत भातंबरेकर, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, ऋषिकेश कोते, कमिटी सदस्य मनोज खिवसरा, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील , श्याम साबळे, अतुल शिंदे, सागर शहा, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा सचिन चव्हाण, तुषार संकलेचा, करण शहा यांनी विशेष. सहकार्य केले.