इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः दीड वर्षांपूर्वी मोठे ॲापरेशन केले. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधताना त्यांनी हा चिमटा काढला.
यावेळी ते म्हणाले की, रुग्णालयातील अडचणी आम्ही कोरोना काळात दूर केल्या. डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे डॉक्टर म्हणजे परमेश्वराचे रुप. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो, असे सांगून शिंदे म्हणाले, की मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो. तेव्हा दुर्गम भागात गेलो. तिथे डॉक्टर चांगले काम करतात.
यावेळी त्यांनी दोन वेळा खासदार झालेल्या तुमाने यांना मी सांगितलं या वेळी निवडणूक लढवायची नाही, तर ते लगेच तयार झाले. खासदार कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.