इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकारण पडलो की कोणत्या प्रश्नाला कसे उत्तर द्यायचे ही एक कला असते. पण, त्यात फारसा अनुभव नसला तर मात्र चांगलीच अडचण होते. धाराशीव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या एका विधानाने चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांना राष्ट्रवादी अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. पण, त्यांचे पती हे भाजपचे आमदार आहे. त्यामुळे त्यांना पत्रकारांनी विचारले की राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? त्यावर पाटील म्हणाल्या माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू. आता या विधानामुळे स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मात्र पित्त खवळले आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी पाटील बार्शीत आल्या होत्या. बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. याचवेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? हा प्रश्न विचारला. त्यानंतर पाटील यांनी मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असे त्यांनी सांगितले. पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली, तोच पक्ष कशाला वाढवू असा सवाल केला.
महायुतीत धाराशीव लोकसभा मतदारसंघाची जागा ही पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. पाटील यांनी अगोदर भाजपत आणि नंतर राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे या बदलातून त्यांचा गोंधळ तर होणारच…