इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार ठरलेला नसल्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष वेगवेगळ्या मार्गाने दावा करत आहे. त्यात ही जागा जवळपास राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवऱ छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात. पण त्याअगोदर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभे रहावे, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे.
आज मनोज जरांगे आज पुण्यातील देहूत होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका, त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, असा इशारा जरांगेनी भुजबळांना दिला.