इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः रामटेकमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या किशोर गजभिये यांना पाठींबा दिल्याने काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अकोला लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॅा. अभय पाटील यांना पाठींबा दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
रामटेकमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात प्रयत्न केले होते. बर्वे यांचा उमेदवारी बाद होण्याची शक्यता व्यक्त करून बी फॉर्मची मागणी त्यांनी केली होती. परंतु काँग्रेसने त्यांचे ऐकले नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसला धक्का दिला. आता वंचित बहुजन आघाडीने गजभिये यांना पाठींबा दिल्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे अकोल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अकोला लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॅा. अभय पाटील यांना पाठींबा दिला आहे. अमरावतील भाजप उमेदवाच्या विरोधात प्रहारने उमेदवार दिला आहे.