नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जनरेट्यामुळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढवणार आहे. त्यांनी मतदार संघात गाठी भेटी सुरू ठेवल्याने त्यांच्या भूमीकेकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी वंचित आघाडी, बसपा, पदाधिका-यांनी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हरिश्चंद्र चव्हाणांच्या गोटातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच पत्ते उघडे करू असे सांगीतले जात आहे.
चव्हाणांच्या गुप्त बैठकांचे राज काय?
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपा उमेदवारास पाठिंबा नसल्याचे सांगून बंडखोरीचे संकेत दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली होती. भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा विरोध असताना केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण संतप्त झाले आहेत. त्यांनी गुप्त बैठकांचा सपाटा लावला असल्याचे समजते. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे सुरुच ठेवल्याने भाजपा गोटात अस्वस्थता पसरली आहे.
 
			








