बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे लोकसभेची प्रचार धुमाळी सुरु असतांना दुसरीकडे बीडमध्ये शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला करणाऱ्या आरोपीमध्ये शिंदे गटाचा जिल्हाप्रमुखच मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माळस जवळा या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बॅनरवरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादातून कुंडलिक खांडे यांनी ज्ञानेश्वर खांडे यांना कट रचून मारहाण केल्याचा आरोप आहे.ज्ञानेश्वर खांडे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या पायांना आणि डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.