इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एक काळ मी राजकारनाशी जुळलो होतो, त्यानंतर मी विचार पण केला नव्हता की मी पुन्हा राजकारणात येणार. परंतु, रामटेक ही प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मी माझा १४ वर्षांचा वनवास संपवून मी उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या प्रचारासाठी रामटेकला आलो आहे. रामटेकवासीयांनी राजू पारवेंवर आशिर्वाद ठेऊन निवडून दिल तर मी आपणास ग्वाही देतो की, मी या पावन भूमीवर पुन्हा आपल्या भेटीसाठी येणार. असा विश्वास शनिवारी दुर्गा स्टेज येथे विशाल सभेत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांनी रामटेकवासीयांना केले.
उमरेड येथे जनसंवाद रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गोविंदाला पाहणाऱ्यांची गर्दीने दोन्ही बाजूचे रस्ते बंद झाले होते. नागरिकांची एकच झुंबडने रोड शो हा आकर्षणाचा केंद्र ठरला. उमरेड येथील दुर्गा स्टेज येथे विशाल सभेत गोंविदाने मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवेसेनेचे जेष्ठ नेते डॉ. दीपक सावंत, माजी खासदार कृपाल तुमाने, शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार आशिष देशमुख, आमदार टेकचंद सावरकर, मुंबई शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या मनिषा कायेंदे, शितल म्हात्रे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, भाजप नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, रामटेकचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘इतनी खुशी मुझे कभी नही हुई’
उमरेड विधानसभा क्षेत्रातील येणाऱ्या कुही, मांढळ, सिल्ली, आपतूर, भिवापूर व उमरेड या ठिकाणी गोविंदा यांनी राजू पारवे यांच्यासोबत जाऊन शिवसेनेचा प्रचार केला. रोड शो व प्रचार सभांमध्ये सहभागी झाले. यावेळी गोविंदा म्हणाले, विदर्भाच्या भूमीत शक्ती आहे. रामटेकचे लाडके उमेदवार असलेले राजू पारवे यांना निवडून दिल्यास तुमचा नी तुमच्या क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार. असे म्हणत त्यांनी ‘इतनी खुशी मुझे कभी नही हुई’ या डायलॉगने सर्वांची मने जिंकली. शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशिर्वादाने आज मी शिवसैनिक झालो आहो. पुन्हा राजकीय नवी सुरूवात मी रामटेक लोकसभा क्षेत्राच्या प्रचारातून करीत आहे. उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांना समस्त रामटेकच्या जनतेने लाखोंच्या मतधिक्याने निवडून द्या. जर आपण रामटेकचा गढ जिकूंन दिल तर मी पुन्हा उमरेड व रामटेकला आपल्या भेटीसाठी येणार अशी ग्वाही शनिवारी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांनी केले.
…तर नक्कीच होणार विकास
आज मी रामटेक निवडणुकीच्या प्रचारात आपण सर्व सहभागी झालेत याचा मला आनंद आहे. महायुतीचे राजू पारवे यांना जिकूंन दिल्यानंतर आपल्या क्षेत्राचा विकास तर नक्की होणार, याची मी आपणास हमी देतो. रामटेक भूमीवर प्रभू श्रीरामांचे पाऊले पडली आहे. या भूमीत येणे माझे सौभाग्य आहे. महायुतीचा विजय होवो, हीच प्रभू श्रीरामापुढे मी प्रार्थना करतो. येणाऱ्या १९ तारखेला आपण राजू पारवे यांच्या धनुष्य बाण चिन्हाची बटन दाबून त्यांना विजय कराल अशी मी आशा बाळगतो असेही गोविंदा यावेळी म्हणाले. जनसंवाद रथाचा रोड शो कुही, मांढळ, सिल्ली, आपतूर, भिवापूर मार्गाने उमरेडला पोहचला. त्यानंतर गंगापूर, आझाद चौक, अशोक विद्यालय, जीवन विकास चौक, पोलिस स्टेशन बायपास, भिसी नाका चौकात सभेचे रूपांतर झाले. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.