नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते. शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिल्याने ते शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्याबरोबर नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय पवार यांनी सुध्दा शिंदे गटात प्रवेश घेतला.
नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला घोलप उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. घोलप पाच वेळा आमदार होते. १९९० ते २०१४ दरम्यान ते देवळाली विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. बघा संपूर्ण पत्रकार परिषद….