इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दोन दिवसात भाजत प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. खडसे यांच्या दिल्ली-मुंबई वारीमुळे या चर्चेला जोर चढला होता. पण, खडसे यांनी प्रवेशाच्या चर्चेला नकार दिला होता. पण, आता त्यांनीच प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
गुरुवारी रात्री ते रोहिणी यांच्यासह मुंबईला गेले होते. तिथे ते पवार यांना भेटून भाजप प्रवेशाची माहिती देणार होते. पण शरद पवार अचानक पुण्याला गेल्यामुळे त्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. शरद पवार यांना विश्वासात घेईपर्यंत खडसे पक्षांतर करणार नाहीत, असे सांगितले जाते.
खडसे यांनी भाजपत प्रवेश केला तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा व त्या पक्षाकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.