इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याण – डोबिंवली लोकसभा मतदार संघात विद्यमान शिवसेना खासदार डॅा. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे आक्रमक झाले आहे. त्यांनी आज ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की कल्याणमध्ये मोठमोठ्या वल्गना करुन आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उध्दव ठाकरे लढणार असं सांगितले जात होते. ते कुठे आहेत. या मतदार संघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही का.. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुढे करुन तुम लढो, हम कपडा संभलाते है अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली अशी टीका शिंदे यांनी केली. अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा नारळ श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
दुसरीकडे देवेंद्र फडवणीस यांनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात असे म्हणण बोचरी टीका केली आहे. तर या मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे कमळ की धनुष्यबाणावर लढणार? असा प्रश्न करत डिवचलं!
दरेकर म्हणाल्या की श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिल्यामुळे आनंद झाला. त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. म्हणून मला शंका आहे की त्यांचं निवडणूक चिन्ह कोणतं असेल. ते कमळ चिन्हावर लढणार आहेत की धनुष्यबाण चिन्हावर. यासाठी त्यांनी अट्ट्हास केला होता का ? देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करावी एवढी त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे का? अशी खोचक टीका वैशाली दरेकर यांनी केली.