माणिकराव खुळे, हवामातज्ञ
….
हवामातज्ञ माणिकराव खुळे यांनी विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यातील किनार पट्टीवरील जिल्ह्यात दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल असे म्हटले आहे.
अवकाळीचे वातावरण व गारपीट – शनिवार ६ ते बुधवार १० एप्रिल पर्यंतच्या ५ दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.परंतु खान्देश व विदर्भ-मराठवाड्यातील २२ जिल्ह्यात मात्र गुढीपाडवा व करीला म्हणजे मंगळवार व बुधवार (९ व १० एप्रिल) असे दोन दिवस मध्यम अवकाळी पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता जाणवते.
किनार पट्टीवरील दमटयुक्त उष्णता-
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात आज व उद्या दोन दिवस म्हणजे (६ व ७ एप्रिल, शनिवार व रविवारी) दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.