नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका रिक्षाचालकाने विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिष विलास दिघे (रा.आझाद चौक,चर्मकार लेन, चव्हाटा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार महिला एकाच भागातील रहिवासी असून त्यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रेमप्रकरण होते. महिलेचा पती विरोधात न्यायालयीन लढा सुरू असल्याने तिच्या असहाय्यतेचा लाभ उठवित संशयिताने हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रेमप्रकरणातील अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताचा अत्याचार वाढल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे करीत आहेत.