इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालमत्तेच्या वादातून संतप्त छोट्या भावाने दिल्लीच्या अलीपुर मध्ये ४० वर्षाच्या मोठ्या भावाला क्रेटा कारने टक्कर देत ३ कि.मी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही व्यापारी असून त्यांच्या या रस्त्यावरील वादाने गाठलेल्या कळसामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
या घटनेतील मोठा भाऊ राजेशकुमार याने सांगितले की, शुक्रवार ते मित्रांना भेटायला बुराडी येथे जात होते. त्यावेळे ट्राफिक जाममध्ये ते फसले. त्यानंतर काय झाले म्हणून मी गाडीखाली उतरल्यानंतर अचानक छोट्या भावाने मला कारची टक्कर दिली. त्यानंतर त्याने १५ ते २० मीनीट मला फरपटत नेले. वाकडी तिकडी गाडी चालवत असल्यामुळे मला वायफरचे सहाय्य घ्यावे लागले. १५ ते २० मीनीट तो फरफटत नेत होता.
कारच्या बोनेटला अडकलेला एक माणूस दिसत असल्यामुळे त्याच व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाला आहे. त्यामुळे ही घटना चर्चेत आली. मालमत्तेच्या वादातून कुटुंबात भांडणे होत असतात. पण, ते मिटवण्याच्या विविध पध्दती आहे. पण, अशा पध्दतीने कारने फरपटत नेणे ही क्रुरता आहे.