नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री बबनराव घोलप हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.घोलप यांचा आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिल्याने ते शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.
घोलप उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असले, तरी त्यांचे पुत्र योगेश घोलप शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की ठाकरे बरोबर राहणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देवळाली विधानसभा मतदार संघात आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा आहे. त्यामुळे योगशे घोलप शिंदे गटात गेले. तर त्यांची अडचण होणार असल्यामुळे त्यांनी अद्याप निर्णय़ घेतला नाही.
नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला घोलप उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. घोलप पाच वेळा आमदार होते. १९९० ते २०१४ दरम्यान ते देवळाली विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते.