नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील क्रेडिट एक्सप्रेस ग्रामीण लिमिटेड या बँकेतील कॅशियर पदावर काम करणा-या व्यक्तीने बँकेत जमा झालेली ११ लाख ७७ हजार रुपयाची रोकड घेऊन फरार झाल्याची घटना घडली होती. बँकेत भरणा करुन येतो अस सांगत कॅशियरने पोबारा केला होता.
याबाबत नांदगाव पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी बारकाईने तपास करीत कॅशिअरला रोख रकमेसह ताब्यात घेतले आणि त्याच्या कडून संपूर्ण रक्कम हस्तगत केली. चोवीस तासात पोलिसांनी या चोरीचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.