कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आई, भाऊ व मामाने रात्रभर केलेल्या बेदम मारहाणीत उच्चशिक्षित तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा हट्ट तरुणीने धरल्यामुळे घरच्यांनी अशी पध्दतीने संताप व्यक्त करत खून केला. वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (वय २४) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती. पण, तीने ती सोडून ती मित्राबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती.
‘लिव्ह इन’मध्ये राहण्याच्या वैष्णवीच्या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगूनही ती निर्णयावर ठाम होती. त्यामळे तीचे कुटुंबियांना प्रचंड राग होता. या रागातून आई शुभांगी, भाऊ श्रीधर व मामा संतोष आडसूळ या तिघांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेले. त्यांनी तिला रात्रभर काठी, गजाने मारहाण केली. त्यानंतर तीला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई, भाऊ व मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पवार कुटुंबीयांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. शुभांगी यांचे पती लक्ष्मीकांत यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्या स्वतःच व्यवसाय पाहतात. मुलगा श्रीधर त्यांना मदत करतो.