इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : समृद्धी महामार्ग असो की एक्सप्रेस हायवे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. त्यातच आता शहरांमध्ये देखील अपघात वाढू लागले असून पुण्यासारख्या शहरात तर वाहनांची संख्या प्रचंड असल्याने रोजच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडत असतात. त्यातच आता एका टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने त्यामध्ये दोन जुळ्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळूहळू व्यक्त होत आहे. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली.
या घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तरप्रदेशमधील झा कुटुंबीय कामानिमित्त पुण्यात भोसरी भागात संत तुकारामनगरमध्ये रहात होते. सर्व झा कुटूंबीय सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. त्यानंतर दुचाकीवरून चौघे विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते. त्यावेळी इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विश्रांतवाडी चौकात सोमवारी घडली.
या अपघातात मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे. साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय ३ वर्षे ६ महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे.