नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२२-२३ वर्षापासून जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सन २०२३-२४ हे मॉडेल स्कुल उपक्रमाचे २रे वर्ष आहे. सन २०२२-२३ च्या १२८ व सन २०२३-२४ च्या ५२१ अशा ६४९ मॉडेल स्कुलची कार्यशाळा आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सहविचार सभा संपन्न झाली.
आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपूर्वी जिल्ह्यातील एकूण ६४९ मॉडेल शाळांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना प्रत्येक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करतांना कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव हवा याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मार्गदर्शन केले, मागील व यंदाच्या वर्षीच्या अशा एकूण ६४९ शाळांची निवड मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे अर्थात ६४९ गावांमध्ये मॉडेल स्कुल उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करावी,लोकसहभागासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये माजी विद्यार्थी समुहांची स्थापना करावी, सद्यस्थितीत मॉडेल स्कूल हा उपक्रम जिल्हा परिषद स्तरावर राबवला जात आहे, ज्यावेळी ही संकल्पना गावाची संकल्पना म्हणून राबवली जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील सर्व शाळा या मॉडेल्स स्कूल म्हणून उदयास येतील असे प्रतिपादन केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी मार्गदर्शन करतांना शिक्षकांना आपल्या सेवेतून गुरू होण्याचा बहुमान मिळतो, पूर्वीच्या काळी गावातील शिक्षक हे गावाचे मार्गदर्शक होते, मॉडेल स्कुलच्या माध्यमातून तीच संधी पुन्हा एकदा आपल्याला आली आहे, लोक सहभागातून आपली शाळा कशी आदर्श शाळा बनवता येईल यासाठी प्रत्येक शिक्षकांने प्रयत्न करावे असे सांगितले.
शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आगामी वर्षात मॉडेल स्कूल उपक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि लोक सहभाग या त्रिसूत्री बद्दल विस्ताराने सांगितले, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तंत्रज्ञान सुविधा यासाठी कुठले उपक्रम राबवता येईल याबद्दल माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, सर्व पंचायत समित्यांचे गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले.
मॉडेल स्कूलचा झाला सन्मान –
या शाळांना जिल्हास्तरीय पुरस्कार –
प्रथम – जि.प. शाळा शिवडे, ता. सिन्नर
द्वितीय – वाजपेयी इंटरनेशनल स्कुल भोयेगाव, ता. चांदवड
तृतीय – जि. प. शाळा जऊळके दिंडोरी ता. दिंडोरी
उत्तेजनार्थ – जि.प. शाळा मोडाळे, ता. इगतपुरी
इगतपुरी – प्रथम – जि.प. शाळा वाडीवऱ्हे
द्वितीय जि.प. शाळा भावली खुर्द
कळवण – प्रथम – जि.प. शाळा भेंडी
द्वितीय जि.प. शाळा गणोरे
चांदवड – प्रथम – जि.प. शाळा मंगरूळ
द्वितीय जि.प. शाळा कुंडलगाव
त्र्यंबकेश्वर – प्रथम – जि.प. शाळा वाघेरा
द्वितीय जि.प. शाळा ठाणापाडा
दिंडोरी – प्रथम – जि.प. शाळा अहिवंतवाडी
द्वितीय जि.प. शाळा विळवंडी
देवळा – प्रथम – जि.प. विद्यानिकेतन शाळा देवळा
द्वितीय जि.प. शाळा रामनगर
नांदगाव – प्रथम – जि.प. शाळा साकोरे
द्वितीय जि.प. शाळा नांदूर
दिंडोरी – प्रथम – जि.प. शाळा अहिवंतवाडी
द्वितीय जि.प. शाळा विळवंडी
नाशिक – प्रथम – जि.प. शाळा विल्होळी
द्वितीय जि.प. शाळा मातोरी
निफाड – प्रथम – जि.प. शाळा कारसूळ
द्वितीय जि.प. शाळा विळवंडी
पेठ – प्रथम – जि.प. शाळा कारसूळ
द्वितीय जि.प. शाळा विळवंडी
बागलाण – प्रथम – जि.प. शाळा नवेरातीर
द्वितीय जि.प. शाळा वायगांव
मालेगाव – प्रथम – जि.प. शाळा साजवहाळ
द्वितीय जि.प. शाळा पाटणे
येवला – प्रथम – जि.प. शाळा उंदीरवाडी
द्वितीय जि.प. शाळा राजापूर
सिन्नर – प्रथम – जि.प. शाळा पांगरीबुद्रुक
द्वितीय जि.प. शाळा मुसळगाव
सुरगाणा – प्रथम – जि.प. शाळा अंबाठा
द्वितीय जि.प. शाळा करवंदे