नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतीअगोदरच सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्याच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यात गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
हा आहे नियम
वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. राज्य सरकारच्या २००६ च्या आदेशाच्या आधारे गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती.