सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी मधील त्र्यंबक प्लास्टिक कारखान्याला दुपारच्या सुमास सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने त्वरित एमआयडीसी तसेच सिन्नर अग्निशामक दलाच्या गाडीला बोलवण्यात आले आहे.
आग कशाने लागली याचे कारण अस्पष्ट असून वारंवार एमआयडीसी परिसरात कारखान्यांना आग लागण्याच्या घटना घडत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.