दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक दिंडोरी वणी रस्त्यावर ढकांबे शिवारात ग्लोबल स्कूल जवळ बोलेरो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये शिंपी टाकळी येथील बाप लेकांचा तर दोन द्राक्ष व्यापारी बंधूंचा समावेश असल्याचे समजते.
शुक्रवारी दुपारी १.३० वाजे दरम्यान ढकांबे शिवारात ग्लोबल स्कू जवळ सचिन पेट्रोल पंप नजिक वणीहून देवदर्शन करून बोलेरो जीप मधून येणारे द्राक्ष व्यापारी यांची बोलेरो गाडी ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकी वर आदळली. त्यानंतर टायर फुटून गाडी थेट झाडावर धडकली त्यात गाडी चक्काचूर झाली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
मोटरसायकल
१) अनिल चिमाजी बोडके (मृत्यू)
२) राहुल अनिल बोडके (मृत्यू))
दोन्ही पिता पुत्र रा-शिंपी टाकळी तालुका निफाड
बोलेरो गाडीमधील प्रवाशी
१)मुकेश कुमार यादव (२५) बोलेरो गाडी चालक व मालक (मृत्यू)
२) अमन रामकेश यादव, (१८) – (मृत्यू)
३) कुसुमदेवी रामकेश यादव (४५)- (मृत्यू)
४) रामकेश श्रीनाथ यादव (५०) (गंभीर जखमी)
५) विकास कपिल देव यादव (३९)- (जखमी)
६) आचल रामकेश यादव (२०) (जखमी)
सर्व राहणार मखमलाबाद, ड्रिंक कॅसल, नाशिक
मूळ राहणार वाराणसी उत्तर प्रदेश