मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील झोडगे येथे पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पाणी टंचाईमुळे निताबाई जाधव व त्यांची मुलगी इच्छामणी या दुपारच्या सुमारास गावाजवळील विहिरीत पाणी व कपडे धुण्यासाठी गेल्या असतांना पाणी काढत असतांना पाय घसून पडल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला,
गुरुवारी सायंकाळी शेळ्या-मेंढ्या चारणा-या गुराखी घराकडे येत असतांना त्यांच्या लक्षात हा प्रकार आले. त्याने गावातील नागरीकांना हा प्रकार सांगितल्याने गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत दोघा माय-लेकींचे मृत देह बाहेर काढले. याप्रकरणी तालुका पोलिसात आस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.