मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे व उन्हाच्या तडाख्यामुळे वन क्षेत्रातील बहुतांश जलसाठे संपुष्ठात आले आहेत. त्याची झळ वन्य प्राण्यांना बसू नये यासाठी वनविभागाने वन क्षेत्रात १४ ठिकाणी कृत्रीम पाणवठे (वॉटर होल) तयार केले आहे.
त्यात रोज पाच हजार लिटर पाणी विकत घेऊन ते पाणवठ्यांमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे जंगलातील विविध प्रजातीच्या वन्यप्राणांची मोठी सोय झाली आहे.