इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली. त्यात भिवंडीतून सुरेश म्हात्रे, बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. ज्योती मेटे यांना बीडमधून मात्र उमेदवारी दिली नाही. त्याचप्रमाणे माढा, सातारा व रावेर येथील जागेचा सस्पेंन्स कायम आहे.
पहिली यादी अगोदर जाहीर केली होती. त्यात बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा, नगर या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यात बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, नगरमधून नीलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे, वर्धातून अमर काळे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली होती.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा असे जागावाटप झाले आहेत. यातील महाविकास आघाडीचे ४५ जागेवर एकमत झाले आहे. पण, तीन जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे.