मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात भाजप राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घेतला. धाराशीव लोकसभा मतदार संघातून त्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचे आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी त्यांनी महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपले आतापर्यंत उमेदवार जाहीर केले. पण, पहिल्यांदा महायुतीची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना नाशिकच्या जागेबाबत प्रश्न विचारल्यानंतर मुंबईसह इतर मतदार संघाच्या निवडणुकीचा टप्पा नंतरचा आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसात त्याची घोषणा होईल. मुंबई सह इतर जागेबाबत वरिष्ठांमध्ये चर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज या पक्षप्रवेश सोहळ्यात महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थितीत होते.