मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते कोणत्याही राजकीय घडामोडीवर आपले मतही नोंदवत असतात. त्यांच्या काही प्रतिक्रिया मात्र चर्चेचा विषय ठरतो अशी एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतांना सर्वोच्च न्यायालयाने अजित दादा गटाला कानपिचक्या दिल्यानंतर त्यावर ही पोस्ट आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सांगितले की, ‘घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल’, असा स्पष्ट उल्लेख प्रचार साहित्यात करण्याचा सज्जड दम ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार! अजितदादा मित्र मंडळाने आता नवीन टॅग लाईन वापरावी…#घड्याळतात्पुरतंअन्वेळवाईट