नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरात महिला मुलीवरील अत्याचार वाढले असून वेगवेगळया भागात घडलेल्या घटनांमध्ये दोन जणींचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनयभंगाचा पहिला प्रकार अश्विननगर भागात घडला. अमोल जनार्दन मानकर या संशयिताने बुधवारी (दि.३) रस्त्याने पायी जाणा-या पीडितेची वाट अडवित विनयभंग केला. अज्ञात कारणातून महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत संशयिताने मारहाण करीत हे कृत्य केले अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
विनयभंगाचा दुसरा प्रकार कामटवाडा भागात घडला. अक्षय खैरणार (२४ रा.उंबरखेडरोड पिंपळगाव ब.) या युवकाने सोमवारी (दि.१) रस्त्याने जाणा-या पीडित तरूणीची वाट अडवित तिचा विनयभंग केला. मयुर हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला. संशयिताने पीडितेस शिवीगाळ व दमदाटी करीत हे कृत्य केले. अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.