मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लासलगाव, मनमाड, नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वाराई कपाती संदर्भात व्यापारी वर्ग व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने हमाल-मापारी यांनी बाजार समितीला पत्र देत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पुढील आदेशा पर्यंत आज पासून मनमाड बाजार समितीतमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहे. नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती.
यासंदर्भात काल व्यापारी व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली मात्र त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये व शेतक-यांचे गैरसोय होऊ नये यासाठी पुढील आदेशा पर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे..