इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. जात पडताळणीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची आज हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करत त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. एकीकडे राणा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार असताना दिल्लीत सर्वोच्च न्यायालय त्यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर निकाल असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. या निकालाची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीत जाहीर सभेत दिली. त्यानंतर सभेत सर्वांनी जोरदार जल्लोष केला.
याअगोदर राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर हा निकाल आला आहे. राणा अमरावतीच्या खासदार असून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी जोमात प्रचार सुरू केला त्यानंतर आज उमेदवारी दाखल केला.