मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाने हिंगोली लोकसभा मतदार संघात हेमंत पाटील यांचे तिकीट कापले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला यवतमाळ – वाशिममध्ये संधी दिली. पण, या घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर चिमटा काढत टीका केली.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो?
लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील..