इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून सत्तर हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. लग्नसमारंभात किंवा गुढीपाडव्याला सोने खरेदी करणा-यांच्या खिशावर आता मोठा भार पडणार आहे. आजपर्यंतचा सोन्याच्या भावाचा हा उच्चांक भाव आहे. जळगावमध्य जीएसटीसह सोन्याचे दर ७१ हजार ४८२ रुपये आहे. ९ मार्च रोजी हेच भाव ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. तर चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत प्रति किलो पोहचले आहे.
महिन्याभरातच सोन्याच्या दरात चार हजार रुपयांच्या आसपास वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे लोक पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोन्याच्या दराने सत्तर हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर सोने खरेदी करण्याचा कल कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर विक्रमी पातळीवर आहेत. अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्याजदरात कपात केल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.