इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ईडीने दिल्ली NCR, हरियाणा, कोलकाता, मुंबई आणि भुवनेश्वर येथे ३० ठिकाणी PMLA, 2002 अंतर्गत भूषण स्टील लिमिटेडच्या प्रवर्तकांविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात शोध आणि सर्वेक्षण ऑपरेशन केले.
या शोध मोहिमेदरम्यान, विविध दोषी दस्तऐवज,डिजिटल उपकरणे, ७२ लाख रोख, ५२ लाखाच्या जवळपास किमतीचे विदेशी चलन,प्रवासी धनादेश, आणि व ४ कोटींचे संपादन मूल्य असलेल्या ३ लक्झरी कार मर्सिडीज बेंझ जप्त केल्या आहेत.
ईडीने दोन दिवसापूर्वी ही शोध मोहिम सुरु करुन कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर आज या सर्व कारवाईची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या वेगवेगळ्या वित्तीय संस्थेविरुद्द मोठ्या कारवाया सुरु आहे. त्यात या स्टील कंपनीच्या विरोधात ही मोठी कारवाई केली आहे.