इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. बुधवारीच राज्याने पार्टीतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव दिल्ली हायकमांडला पाठवला होता.त्यानंतर काही वेळातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनुशासनहीन आणि पक्षविरोधी विधानांच्या तक्रारींनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यास मंजुरी दिली.
बुधवारी राज्य काँग्रेसने त्यांचे नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती आणि समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती पटोले यांनी दिली.
राज्य काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त ऊर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी, पार्टी वाचवण्यासाठी तुमची उरलेली ऊर्जा आणि स्टेशनरी वापरा. असं असलं तरी पक्ष गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज पूर्ण झाला आहे. उद्या मी स्वतः निर्णय घेईन.
पण, या प्रतिक्रिया नंतर रात्रीच काँग्रेसने निर्णय घेऊन त्यांची हकालपट्टी केली.