नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिनीच्या अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा कमी करण्यासाठी ३ हजार रुपयाची लाच स्विकारतांना विहितगाव येथील तलाठी सतिष गिरीश नवले, व खासगी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000/- चे 25 टक्के म्हणजे 25, 000/- रुपयेचा भरणा केला असल्याने तहसीलदार नाशिक यांनी आरोपी लोकसेवक नामे सतीश नवले, तलाठी, विहित गाव यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी आदेशित केले होते.
तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने आरोपी लोकसेवक नामे – सतिष नवले तलाठी विहितगांव व त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खाजगी मदतनीस दत्तात्रय ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात खाजगी इसम नामे दत्तात्रय ताजनपुरे यांनी आरोपी लोकसेवक नामे सतिष नवले, तलाठी विहितगाव, यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे 4000/- रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोडअंति 3000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व 03/04/2024 रोजी पंचांसमक्ष 3000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- महिला, 38 वर्षे
▶️ आलोसे– 1) सतिष गिरीश नवले, वय 48 वर्ष, तलाठी सजा-विहीतगांव ता.जि. नाशिक राहणार – फ्लॅट नंबर – 303, अक्षराधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक
2) दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे, वय – 43 वर्षे, तलाठी कार्यालय विहितगाव येथे तलाठी यांना खाजगी मदतनीस, राहणार – राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक-पुणे रोड चेहडी बु ll नाशिक रोड नाशिक. (खाजगी इसम)
▶️ लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- 03/04/2024 रोजी 4000 रुपये, तडजोडअंति लाच स्वीकारण्याचे मान्य केले 3000/- रुपये.
▶️ लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– 03/04/2024 रोजी 3000/- रुपये
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000/- चे 25 टक्के म्हणजे 25, 000/- रुपयेचा भरणा केला असल्याने तहसीलदार नाशिक यांनी आरोपी लोकसेवक नामे सतीश नवले, तलाठी, विहित गाव यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी आदेशित केले होते.
तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने आरोपी लोकसेवक नामे – सतिष नवले तलाठी विहितगांव व त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खाजगी मदतनीस दत्तात्रय ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात खाजगी इसम नामे दत्तात्रय ताजनपुरे यांनी आरोपी लोकसेवक नामे सतिष नवले, तलाठी विहितगाव, यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे 4000/- रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोडअंति 3000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व
दिनांक- 03/04/2024 रोजी पंचांसमक्ष 3000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .जिल्हाधिकारी नाशिक
▶️ सापळा अधिकारी
श्री. संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 8605111234
▶️ सापळा पथक–
पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर
पोलीस शिपाई/ नितीन नेटारे
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .