मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

by India Darpan
एप्रिल 3, 2024 | 7:17 pm
in राज्य
0
Election logo nivdnuk aayog e1702627232547

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे व नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकींग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच दिशा देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान करायलाच हवे. याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.

मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स् 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे. सदर लिंक जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…दुचाकी पार्क करीत असतांना ६५ वर्षीय वृध्दावर लोखंडी रॉडने हल्ला, गुन्हा दाखल

Next Post

डॉ. निलेश साबळेची कलर्स मराठी वर नवी इनिंग…( बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240403 190246 Dailyhunt

डॉ. निलेश साबळेची कलर्स मराठी वर नवी इनिंग…( बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011