इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंगोली लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याएेवजी बाबुराव कदम कोहळीकरांना यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी अगोदर दिलेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर वेळ आली आहे. तर दुसरीकडे यवतमाळमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यामान खा. भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
हिंगोलीत व यवतमाळमध्ये विद्यमान खासदारांना प्रचंड विरोध होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या मतदार संघात उमेदवार बदलण्याची चर्चा होती. खा. हेमंत पाटील यांनी काल वाहनांचा ताफा घेऊन मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. पण, त्याचा उपयोग झाला नाही. पण, पत्नीला उमेदवारी मिळाली. तर खा, भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
शिवसेना शिंदे गटात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही जागांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यात एका मतदार संघात उमेदवारी बदलली आहे. त्यामुळे आता हिंगोली लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी सामना होणार आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आला आहे. त्यांचा सामना आता ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याबरोबर होणार आहे.