येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालूक्यातील धानोरे शिवारात येवला-मनमाड मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार दिपक नामदेव खुळे यांचा उपचारा दरम्यान येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
त्यांच्या सोबत असलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थींनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र धडक देणारे अज्ञात वाहनचालक मात्र फरार झाला. पोलिस या वाहनचालकाचा शोध घेत आहे.