नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– डिझेल टाकून स्व:तास पेटवून घेणा-या ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना निलगिरी बाग भागात घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत ज्ञानदेव कुंदे (रा.म्हाडा बिल्डींग,बिडीकामगार नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुंदे यांनी ३० मार्च रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराजवळ स्व:ताच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेतले होते.
या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने अनिता कुंदे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. निलेश सर्यवंशी यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक देसाई करीत आहेत.