इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रार्थना बेहेरे ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सिनेसृष्टीतील सुंदर व गुणी अभिनेत्री असे प्रार्थना बेहेरे हिला म्हटले जाते, आपल्या अभिनयासोबतच तिने तिच्या सौंदर्याने देखील अनेक चाहत्यांना घायाळ केले असून आता नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिने स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. त्यामुळे ती चर्चेत झाली होती. मात्र आता तिने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता प्रार्थना एक व्यावसायिक महिला (बिझनेस वूमन ) झाली आहे. तिने तिचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे तिने तिची नणंद पल्लवी भिडेच्या साथीने साड्यांचा नवा ब्रॅन्ड सुरू करीत व्यवसाय थाटला आहे.
नवरात्रोत्सवात नऊ दिवसांसाठी नऊ रंगाच्या साड्या
प्रार्थनाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. ‘वी नारी’ असे या ब्रँडचे नाव आहे. इंस्टा लाईव्ह येत अभिनेत्री प्रार्थनाने चाहत्यांना या ब्रँडची माहिती दिली आहे. प्रार्थनाने लिहिले आहे,”स्वत:चा ब्रँड सुरू करण्याची माझी खूप इच्छा होती. गेल्या काही दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होते. आता मी आणि माझ्या नणंदेने मिळून आम्ही एक ब्रँड सुरू केला आहे याबाबत प्रार्थनाने पुढे म्हटले आहे की ,वी नारी हा साड्यांचा सुंदर ब्रँड आहे. नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे नऊ दिवसांसाठी नऊ रंगाच्या साड्या इथे मिळतील. या साड्या कशा खरेदी करायच्या यासंदर्भात लवकरच माहिती देईल.
चाहत्यांनी दिला तिला शुभेच्छा
.प्रार्थना बेहेरने २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले असून या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रार्थनाने २००९ मध्ये ‘रीटा’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले असून वर्षाला ती सुमारे १३ कोटींची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे.