नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- के.के.वाघ महाविद्यालय जवळ आर्थिक वादातून कॅफेचालकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना महामार्गावरीलघडली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश ढोमसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कॅफेचालकाचे नाव असून त्याचा के.के.वाघ महाविद्यालय जवळ दुर्गा कॅफे नावाचा व्यवसाय आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याने गेल्या ३० नोव्हेंबर रोजी पिडीता कॅफेवर पैश्यांची मागणी करण्यासाठी गेली असता ही घटना घडली.
संतप्त संशयिताने तुझा काय संबध पैसे मागण्याचा असे म्हणत महिलेस शिवीगाळ केली. तसेच हात पिरगळून ढकलून देत विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.