मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात जळगावमधून पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार, कल्याण -डोबिंवली मतदार संघातून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी व हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी मशालीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्यानंतर या ठिकाणी ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर कल्याण मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या रणरागिणी वैशाली दरेकर यांना उमेदवार दिली आहे. जळगावमधून भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. पण, या ठिकाणी धक्का देत पाटील यांचे खंदे समर्थक पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी दिली आहे.
या अगोदर ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता चार उमेदवारांची यादी जाहीर केली असून एकुण उमेदवारांची संख्या आता २१ झाली आहे.
या अगोदर जाहीर केले होते हे १७ उमेदवार
पहिल्या यादीत लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने १७ उमदेवार जाहीर केले होते. त्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उमेदवारः बुलडाणा-प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ –वाशिमः संजय देशमुख, मावळ-संजोग वाघेरे पाटील, सांगली-चंद्रहार पाटील, हिंगोली-नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर-चंद्रकांत खैरे, धाराशीव-ओमराजे निंबाळकर, शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक-राजाभाऊ वाजे, रायगड-अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरीः विनायक राऊत, ठाणे-राजन विचारे, मुंबई- ईशान्यः संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिणः अरविंद सावंत, मुंबई-वायव्यः अमोल कीर्तिकर, परभणी-संजय जाधव, दक्षिण मध्य मुंबईः अनिल देसाई ठाकरे गटाच्या चार-पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप व्हायची आहे. ‘