नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार व शहादा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींच्या 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा तहसिलदार नंदुरबार व शहादा यांच्या पातळीवर 4 एप्रिल रोजी होणारा कार्यक्रम 4 एप्रिल ऐवजी 8 एप्रिल, 2024 रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीस प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महिला सरपंच आरक्षण…
तसेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीमधील महिला सरपंच पदासाठी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करुन निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी नंदुरबार व शहादा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व या कालावधीत गठीत होत असल्याने या ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सभा बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नदुरबार येथे 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) नंदुरबार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.