इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळेः लाचखोर स्थानिक गुन्हे शाखेचे पेालिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात सुमारे सव्वादोन कोटींचे घबाड सापडले. सुमारे ६० लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने, ७७ हजार रुपये किमतीचे चांदीची भांडी व दागिन्यांचा समावेश आहे. या शिवाय कुटुंबीय व नातलगांच्या नावाने असलेली सुमारे एक कोटी ७५ लाखांच्या मालमत्तेचे दस्तावेज सापडले आहेत. दोन कोटी ३५ लाखांपर्यंत आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच प्रकरणात दोन दिवसापूर्वीच त्यांच्यासह दोन हवालदरा एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.
पोलिस निरीक्षक शिंदे यांच्यासह तिघांना धुळे न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तिघांची दोंडाईचा पोलिस ठाण्यातील कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
असे सापडले जाळ्यात
हद्दपारी टाळण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. लाचेची रक्कम घेण्यासाठी हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील हे दोंडाईचाला गेले. तडजोडीत दीड लाख रुपये देण्याचे ठरले; परंतु धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आधीच तक्रार करण्यात आल्याने पथकाने मोहने व पाटील यांना लाच घेताना ताब्यात घेतले. या पथकाने मिल परिसरातील दत्तात्रय शिंदे यांच्या घराची झडती घेतली. त्यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी सुरू आहे. मोहने व पाटील यांच्या घराचीदेखील झडती घेण्यात आली.
ही केली होती कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष , 35 वर्ष, जिल्हा- धुळे
आलोसे –
1) दत्तात्रय सखाराम शिंदे, पद- पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ( वर्ग- 1) , रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड
2) नितीन आनंदराव मोहने, पद -पो हवा. 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, ( वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे.
3) अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद- पो. हवा 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. ( वर्ग- 3) रा .- प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- दि. 01.04.2024 रोजी 2,00,000/-रुपये .
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक- दि. 01.04.2024 रोजी 1,50,000/- रू
लाचेचे कारण – यातील नमूद तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 2,00,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम आलोसे क्र 2 व आलोसे क्रं 3 यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी आलोसे क्रमांक 2 व आलोसे क्र 3 यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. वरील अलोसे 1 ते 3 यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. पोलीस महासंचालक सो., महाराष्ट्र राज्य मुंबई.
परिवेक्षण अधिकारी-
श्री. अभिषेक पाटील
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.धुळे
मो.न.8888881449
सापळा अधिकारी-
रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, , पो.ना. संतोष पावरा, पो. शि.रामदास बारेला, चालक पो. शि. बडगुजर
सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .