मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम सुरु केले आहे. हे अनाधिकृत काम मी स्वत.हून पाडतो असे सदानंद कदम यांनी न्यायालयाने सांगितले. त्यात त्यांनी पुण्यातील कंपनीला हे काम दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर हे बांधकाम पाडण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान भाजप नेते किरीट सौमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, बेकायदा तोडकाम सुरू झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहे हिसाब तो देना पड़ेगा
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा FIR 178/2022 दिनांक 14/11/2022 दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील साई रिसॉर्ट बेकायदेशीर बांधकाम हे अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे जमिनीची मालकी असताना झाल्याने व त्यांनी गुन्हेगारी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. साई रिसॉर्टचे बाधंकाम अवैध असल्याने सदानंद कदम व अनिल परब याचेविरूद्ध महा. प्रादेशीक नगररचना अधि. १९६६ चे कलम ५२ (२),५३ व भा.दं. वि.क.३४ प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. कारवाई तर होणारच हिसाब तो देना पड़ेगा असे म्हटले आहे.