मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –वंचित बहुजन आघाडीने राज्यातील लोकसभेसाठी पाच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला आहे तर पुणे येथे वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितची पहिली यादी आठ उमेदवारांची होती. दुसरी यादी ११ उमेदवारांची होती. आता तिसरी यादी ५ उमेदवारांची यादी आहे. त्यामुळे वंचितचे २४ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीने वंचितला सहा जागांची ऑफर दिली होती. पण, वंचितने आपला वेगळा मार्ग निवडत ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीबरोबर काडीमोड घेतल्यानंतर वंचित तिसरी आघाडी म्हणून लोकसभेच्या जागा लढवणार आहे. मागील लोकसभेची पुनरावृत्ती करत ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे त्याचा फटका आता कोणाला कसा बसतो हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
लोकसभेसाठी वंचितची तिसरी आघाडी
नांदेड – अविनाश बोसीकर
परभणी – बाबासाहेब भुजंगराव उगले
औरंगाबाद – अफसर खान
पुणे -वसंत मोरे
शिरूर – मंगलदास बागुल
राज्य समितीने बारामती लोकसभा मतदारसंघातून (पीसी क्र. 35) उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे; VBA राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) उमेदवाराला पाठिंबा देईल.
लोकसभा निवडणुकीसाठी वंचितची दुसरी यादी
हिंगोली – डॉ. बी.डी.चव्हाण
लातूर -नरसिंगराव उदगीरकर
सोलापूर- राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारस्कर
सातारा- मारुती धोडीराम जानकर
धुळे- अब्दुर रहमान
हातकणंगले – दादासाहेब उर्फ दादागौडा
रावेर – संजय पंडित ब्राह्मणे
जालना – प्रभाकर देवमण बाकले
मुंबई उत्तर मध्य – अब्दुल हसन खान
रत्नागिरी- सिंधदुर्ग – काका जोशी
लोकसभा मतदार संघ उमेदवारांची पहिली यादी
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – कु. प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार