इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा तिढा आता वाढला असून काँग्रेस नेते विश्वजीत कदम आता आक्रमक झाले आहे. कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड आणि बैठकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. ते काँग्रेस राज्य प्रचार निवड बैठकीलला गैरहजर राहणार आहेत. ३ एप्रिलला मुंबईत दुपारी १ वाजता प्रचार समितीची बैठक आहे.
या पत्रात जोपर्यंत सांगलीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही बैठकीला येणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवले आहे. सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी कदम आग्रही आहे.