इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारानिमित्त सभा संपन्न झाले. या सभेत युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार हे उपस्थितीत होते.
यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून संबोधित केले. संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी यवतमाळ-वाशिमची स्वाभिमानी जनता संजय देशमुख यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, धीरजजी लिंगाडे, आ. सुनील भुसारा, आ.अमित झणक, रविकांत वर्पे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.