इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप नेते खासदार उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील हे माहित नाही. पण, हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील असेही त्या म्हणाल्या. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहेत असेही त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांना उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडण्यात आल्यामुळ येथे छगन भुजबळ उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाल्याची बातमी काल समोर आली. त्यानंतर गोडसे यांच्या गटात हालचाली सुरु झाल्या.
आज मुंबईत हेमंत गोडसे, छगन भुजबळ व दादा भुसे हे सर्व मुंबईला रवाना झाले. त्यानंतर नाशिकच्या उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट होईल. पण, त्याअगोदर खासदार गोडसे यांच्याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात असून त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढेल की कमी होईल हे मात्र सांगता येणार नाही. दरम्यान नाशिकच्या जागेचे चित्र आज स्पष्ट होईल असे बोलले जात आहे.